लोकसहभागातून बिरसी शाळा डिजीटल

0
14

गोंदिया : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्याला १00टक्के प्रगत करण्यासाठी जि.प.चे प्रयत्न सुरू आहे. सर्व विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे ज्ञान असावे या उद्देशाने संपूर्णजिल्हा लोकसहभागातून डिजीटल शाळा करण्याचा संकल्प घेतला.त्या अनुसंगाने माझ्या जिल्हा परिषद क्षेत्रातील प्राथ.शाळा बिरसी ने डिजीटल शाळा करुन प्रथम मान मिळविला. त्याकरिता मुख्याध्यापकासह सर्व शिक्षकांचे व गावकर्‍यांचे कौतुक करते, असे उदगार जि.प.अध्यक्षा उषा मेंढे यांनी काढले.
त्या बिरसीच्या डिजीटल शाळा उद््घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमगाव पं.स.चे उपसभापती ओमप्रकाश मटाले, प्रमुख अतिथी म्हणून पं.स.चे उपसभापती लोकेश अग्रवाल, केंद्रप्रमुख डी.एल.गुप्ता, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजकुमार चौधरी, सरपंच राजाराम राऊत, उपसरपंच मुनेश्‍वर खोब्रागडे, सरपंच पी.के.चौधरी, प्रल्हाद चौधरी, सामाजिक कार्यकर्ता मंगरू अंबुले, सहेसराम सोनवाने, पुरुषोत्तम वासनिक, देवचंद सोनवाने, नारायण अग्रवाल, ग्रा.पं.सदस्या पुष्पा सोयाम, यमन रहांगडाले, उर्मिला बावनथडे, सुरेश पटले, प्रेमिका सोयाम, अनुसया पंधरे, सीमा नागरीकर, लुसंगना उईके, वच्छला उईके, वशिला खुळसुंगे, वासनिक, ममता पटले, पिपरटोला शाळेचे मुख्याध्यापक सुंदर बडे, लिल्हारे बघाडे व बिरसी शाळेच मुख्याध्यापक एल.यू. खोब्रागडे उपस्थित होते.