फुक्कीमेटा येथे डिजिटल शाळेचे उद््घाटन

0
9

आमगाव : तिगाव केंद्रांतर्गत जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा फुक्कीमेटा शाळेला लोकवर्गणीतून डिजिटल करण्यात आले. उद््घाटन आ. संजय पुराम यांच्या हस्ते, जि.प. अध्यक्ष उषा मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून शिक्षण सभापती पी.जी.कटरे, जि.प. सदस्य जियालाल पंधरे, पं.स. सदस्य अशोक पटले उपस्थित होते. आ. संजय पुराम यांनी आमदार निधीतून दीड लाख रूपये देण्याची घोषणा केली. तसेच गोरगरिबांच्या मुलांना याचा लाभ मिळावा याकरिता शिक्षकांनी जागृक रहावे, असे मत व्यक्त केले. या वेळी गटशिक्षणाधिकारी के.वाय. सर्याम, शिक्षणविस्तार अधिकारी डब्ल्यू.एस. घोष, सरपंच दिगंबर चौधरी, उपसरपंच अनिता पटले, यादोराव पोगळे, जी.टी. धुर्वे, माजी सैनिक भैयालाल चव्हाण, जे.डी. मेश्राम उपस्थित होते. संचालन आनंद डोंगरे यांनी केले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका सी.जी. धुर्वे, आर.जे. पटले व सर्व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.