उच्च न्यायालयाची स्थगिती,सेवानिवृत्तीच्या वाटेवरील शिक्षकांना मिळाला दिलासा

0
33

गोंदिया,दि.02ः-ग्रामविकास मंंत्रालयाकडून प्राथमिक शिक्षकांच्या आँनलाईन बदल्या प्रक्रिया अंतिम टप्यात असून 53 वर्षापेक्षा जास्त वयाच्या प्राथमिक शिक्षकांची अवघड क्षेत्रात रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी यादी प्रकाशित केली.त्यामध्ये सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावर असलेल्या प्राथमिक शिक्षकांवर अन्याय होणार होता.त्यासंदर्भात शासन निर्णयाला घेऊन गोंदिया जिल्ह्यातील 35 शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने नवीन शासन निर्णय काढल्याने सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.एल.यु.खोब्रागडे यांच्या नेतृत्वात आमदार विनोद अग्रवाल,विजय रहागंडाले,जिल्हा परिषद बांधकाम सभापती संजय टेंभरे,प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ.महेंद्र गजभिये यांच्याशी भेट घेत शासनाने केलेल्या अन्यायाविरुध्द माहिती देत ग्रामविकास विभागाकडून आदेश रद्द करण्यासंबधी विनंती करीत निवेदन दिले होते.तसेच या आदेशाविरुध्द एल.यु.खोब्रागडे यांनी नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करुन केली होती.त्यावर 24 फेबुवारीला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली.त्यामुळे न्याय प्रविष्ठ शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.उच्च न्यायालयाच्या स्थगितीनींतर ग्रामविकास विभागाने पत्र काढून 53 वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना होकार किंवा नकारची संधी.त्यामुळे सेवानिवृत्तीच्या वाटेवरील एल.यु.खोब्रागडे,श्रीकृष्ण कोरे,रेखा पटले,आर.एफ.शेंडे.आर.एच.कटरे,डी.एस.ढबाले,कांता पारधी,विकास भांडारकर,बी.बी.मेंढे,खातुननिशा शेख,के.डी.सोलंकी,सुशीला भुरे,शोभा सेवईवार,मन्नूलाल नागपूरे,आर.ई.खापर्डे,एस.आर.मेंढे,धृर्पता पारधी,हरिश नानकानी,जे.बी.टेंभरे,आर.टी.गणवीर,एस.डी.ब्राम्हणकर,पी.टी.पटले,शैलेश सेवईकर या शिक्षकांनी उच्च न्यायालयाचे अॅड संतोष चांडे,आमदार विनोद अग्रवाल,विजय रहागंडाले यांचे अन्यायग्रस्त शिक्षकांनी आभार मानले आहे.