ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा धरणे आंदोलन

0
39

गोंदिया,दि.02ः महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (संलग्न आयटक) गोंदिया जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा परिषदेवर फुलचुर नाका येथून धड़क मोर्चा काढून जि. प.समोर धरणे आंदोलन करण्यात आले. महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष काॅ.मिलिंद गनविर, जिल्हाध्यक्ष चत्रुघण लांजेवार, आयटक जिल्हा सचिव कॉ.रामचंद्र पाटील,संघटन सचिव विष्णु हत्तीमारे,ईश्वरदास भंडारी,खोजराम दरवड़े, बुधराम बोपचे,दिप्ती राणे,अशोक परशुरामकर,विनोद शहारे,किशोर नागपुरे यांचे नेतृत्वात निघालेल्या मोर्च्यात राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी राज्यातील शाळांतील शौचालयाची सफाई ग्रामपंचायत पंचायत कर्मचाऱ्यांकडून करवुण घेण्याचे केलेल्या वक्तव्याचा तिव्र निषेध नोंदवण्यात आला. तसेच मंत्र्यानी राज्यातील 60 हजार कर्मचाऱ्यांची माफी मागावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.किमान वेतनावर राज्य शासनातर्फे वसुली व ऊत्पन्नची अट लादुन दिला जाणारा वेतनाचा हिस्सा कर्मचाऱ्यांचे खात्यात जमा होतो पण ग्रामपंचायतीचा हिस्सा कर्मचाऱ्यांना नियमित दिला जात नाही म्हणुन नियमा प्रमाणे दर महिण्याचे 5 तारखेचे आत अदा करण्यात यावे,वेतन व भत्याचे एकुण रक्कमेवर 8.33 टक्के रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यात नियमित जमा करावी व याबाबत ग्रामसेवकांकड़ुण त्यांचे संघटनेचा निर्णय म्हणुन अड़थडा निर्माण करण्याचा निषेध करण्यात आला.10 टक्के आरक्षणांतर्गत वर्ग 3 व वर्ग 4 पदावर भर्ती करणे, दिलेल्या तक्रारीवर त्वरित कार्रवाई व्हावी, शेवासर्तीची अंलबजावणी न करणा-यां ग्रामसेवक ग्रा.वि अधिका-यांवर उप मुख्य कार्यकारी अधिका-यांनी नियमा प्रमाणे शिस्तभंगाची कार्यवाही करावी ,नियमा प्रमाणे जि.प.व पं.स स्तरावर तक्रार निवारण समितीच्या सभा घेण्यात याव्यात, जलसुरक्षाचे मानधनात वाढ़ व जि.प.कड़ुन किंवा वित्त आयोगाच्या निधीतुन ऊत्तम दर्ज्याचा एंड्रायड मोबाइल उपलब्ध करूण द्यावे या मागण्यांबाबत निवेदन सादर करून सकारात्मक चर्चा करण्यात आली.तक्रारीवर 15 एप्रील पर्यंत निर्णय न झाल्यास जिल्ह्तील ग्रामपंचायत कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याचा ईशारा महासंघाने दिला. या आंदोलनात प्रामुख्याने ऊत्तम डोंगरे, सुनिल लिल्हारे, मुकेश कापगते,निलेश मस्के, डुलेश गोटाफोड़े, मिथुन राहुलकर, ममता गौतम, देवचंद बारापात्रे, गणेश कांबड़ी, किशोर नागपुरे, नरेंद्र कावड़े, सुरज रामटेके, भाऊराव कटंगकार, जगदिश ठाकरे,मुकेश ऊपराड़े सह 300 च्या वर कर्मचारी सहभागी होते.