नारायण राणेंपासून यामिनी जाधवपर्यंत!भाजपमध्ये येताच बंद झाली या 8 नेत्यांची चौकशी…

0
27

तर काँग्रेस नेते शशि थरुर यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.तर शशि थरुर यांनी ट्विट करत 8 मंत्र्यांच्या नावाची यादीही दिली आहे.

️दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची मद्य धोरणाच्या कथित घोटाळ्याच्या आरोपाखाली 26 फेब्रुवारीला आठ तास चौकशी झाली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.आज मनीष सिसोदिया यांनी आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. याप्रकरणी काँग्रेस नेते शशि थरुर यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. शशि थरुर यांनी ट्विट करत आठ मंत्र्यांच्या नावाची यादी दिली आहे. ज्यांच्याविरोधात चौकशी सुरु होती, पण भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची चौकशी बंद करण्यात आली.

सोशल मीडियावर शेअर केली यादी

शशि थरूर यांनी ट्विटरवर आठ नेत्यांच्या नावाची यादी दिली आहे. यात महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री नारायण राणे,खासदार भावना गवळी,आमदार प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, यामिनी जाधव, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा, कर्माटकेच माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्प आणि शुभेंदु अधिकारी यांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते. पण भाजपमध्ये प्रवेश केल्यानतंर या सर्व नेत्यांविरोधातील चौकशी बंद करण्यात आली.


️️”ना खाऊंगा ना खाने दूंगा’

पंतप्रधान मोदी यांच्या ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ या घोषणेची थरुर यांनी खिल्ली उडवली आहे. मोदी यांना बहुतेक बीफच्या बाबतीत हे म्हणायचं असेल असं थरुर यांनी म्हटलंय.

मनीष सिसोदि यांना जेल

दरम्यान दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर सिसोदिया यांना कोर्टात हजर करण्या आलं. यावेळी न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची म्हणजे 4 मार्चपर्यंत सीबीआय कोठडीत सुनावली.मनीष सिसोदिया यांच्याकडे दिल्ली सरकारमधील 8 विभागांची जबाबदारी होती. आता त्यांच्याकडे असणारी सर्व खात्यांचा कारभाव कॅबिनेट मंत्री कैलाश गेहलोत आणि राजकुमार यांच्याकडे दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सत्येंद्र जैन यांचाही राजीनामा

दरम्यान आपचे आणखी एक मंत्री सत्येंद्र जैन यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सत्येंद्र जैन हे दिल्ली सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते. मनी लॉण्ड्रींग प्रकरणात गेल्या वर्षी मे महिन्यात सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आली होती. सत्येंद्र जैन यांनी 2015-16 दरम्यान मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप आहे. कोलकाता इथल्या बेनामी कंपन्यांमधील हवाला गुंतवणूक प्रकरणी त्यांच्यावर ईडीनं कारवाई केली आहे.