22.9 C
Gondiā
Friday, August 28, 2026
Home शैक्षणिक धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात करियर कट्टा अंतर्गत विध्यार्थी संवाद सत्राचे आयोजन

धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात करियर कट्टा अंतर्गत विध्यार्थी संवाद सत्राचे आयोजन

0
39

गोंदिया,दि.24ः उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान सहाय्य केंद्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने १८ एप्रिल रोजी “तरुण विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करिअर कट्ट्याचे महत्त्व” या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन राजेंद्र जैन, सचिव, गोंदिया शिक्षण संस्था, निखिल जैन, संचालक, गोंदिया शिक्षण संस्था आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. शिक्षणमहर्षी स्व. मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व आदरांजली अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उदघाटक डा.अंजन नायडू प्राचार्य. धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय ,गोंदिया , मुख्य मार्गदर्शक मा. यशवंत शितोळे , अध्यक्ष महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डा. जयंत महाखोडे , एन.ई.पी समन्वयक-डा.दिलीप चौधरी, आई क्यू ए सी समन्वयक-डा . मनोज पटले आणि कार्यक्रमाचे संयोजक प्रा. धर्मवीर चौहान या प्रसंगी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उदघाटक, महाविद्यालयाचे प्राचार्य, डा. अंजन नायडू यांनी आपल्या मार्गदर्शनात करियर कट्टा उपक्रमाची पार्श्वभूमी विशद केली. विध्यार्थ्यांनि उच्च शिक्षणाच्या सुरुवातीच्या वर्षां पासूनच आपल्या भविष्याची दिशा ठरवणे गरजेचे आहे. विध्यार्थ्यांना विविध स्पर्धापरीक्षांची माहिती व मार्गदर्शन मिळावे, उद्जयोजकतेचे बीजांकुर मनात रुजविले जावे व उद्योजकतेचे मार्गदर्शन मिळावे . शोबतच व्यक्तिमत्व विकासासारखे विध्यार्थी हिताचे जोड अभ्यासक्रम नियमित करता यावे या उद्देशाने महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभाग , महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान सहाय्यता केंद्रा द्वारे करियर कट्टा हा उपक्रम सुरु करण्यात आला. मागील ३ वर्षात करियर कट्टा हे नाव महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यंपर्यंत पोचलेले आहे. भविष्यात करियर कट्टा,महाराष्ट्रातुन यशस्वी अधिकारी, उद्योजक व सुजाण नागरिक घडविण्याच्या प्रक्रियेत मोलाचे ठरेल हा विश्वास व्यक्त केला.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डा. जयंत महाखोडे यांनी यांनी करिअर कट्टा या महाराष्ट शासनाच्या उपक्रमाचे विद्यार्थ्यांना होणारे फायदे विशद केले, तसेच विध्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. डा. दिलीप चौधरी , एन.ई.पी समन्वयक यांनी “करियर कट्ट्याचे एन.ई.पी २०२०” नुसार असलेले महत्व विशद केले. कार्यक्रमाचे संयोजक व करियर कट्टा जिल्हा संयोजक प्रा. धर्मवीर चौहान यांनी धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाची करियर कट्टा उपक्रमा अंतर्गत सेन्टर ऑफ एक्सलेन्स आणि मॉडेल स्किल सेन्टर करीता निवड झाल्या बद्दल सर्वांचे अभिनंदन केले.
मार्गदर्शन सत्रात मुख्य मार्गदर्शक मा. यशवंत शितोळे यांनी युवा विध्यार्थ्यांच्या भविष्यासाठी करिअर कट्ट्याचे असलेले महत्व या विषयावर पद्युत्तर व पदवी अभ्यासक्रमाच्या विध्यार्थ्यांना मार्गर्शन केले. तसेच करियर कट्टा हि एक चळवळ म्हणून उभी राहते आहे. करियर कट्टा प्रयेक विध्यार्थ्यां पर्यंत पोचवणे याकरिता सर्व प्राचार्य व समन्वयक व शिक्षण यांनी पुढाकार घयावा असे आवाहन केले.
या मार्गदर्शन सत्रात गोंदिया जिल्ह्याचे दुसरे जिल्हा समन्वयक , प्रा. सतीश सहारे -निर्धनराव पाटील, कला व विज्ञान महाविद्यालय, चोपा, धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक यांची उपस्थिती लाभली. तर मार्गदर्शन सत्राचा जवळ जवळ २५० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या प्रसंगी धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय , गोंदिया आणि महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभाग , महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यात पुढील ५ वर्षा करीता सामंजस्य करार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजक व करियर कट्टा जिल्हा संयोजक प्रा. धर्मवीर चौहान यांनी मार्गदर्शक यांची ओळख करुन दिली.डाँ. स्नेहा जायस्वाल-शुक्ष्मजीवशास्त्र विभाग यांनी आभार मानले तर सूत्र संचालन कु अवनी मेठी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.