धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय येथे मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी विद्यार्थी शाखेचे उदघाटन

0
13

गोंदिया-मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी , इंडिया आणि धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय गोंदिया येथे मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी विध्यार्थी शाखेचे उदघाटन राजेंद्र जैन, सचिव, गोंदिया शिक्षण संस्था, निखिल जैन संचालक गोंदिया शिक्षण संस्था आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. शिक्षणमहर्षी स्व. मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व आदरांजली अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ.अंजन नायडू होते. उदघाटक म्हणून राष्ट्रीय समन्वयक डाॅ. संजीव पाटणकर,मुख्य मार्गदर्शक महेंद्र ठाकूर , उपप्राचार्य डा. जयंत महाखोडे, माजी उपप्राचार्य प्रा. संजय तिमांडे , आई क्यू ए सी समन्वयक-डाॅ .मनोज पटले आणि कार्यक्रमाचे संयोजक प्रा. धर्मवीर चौहान या प्रसंगी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष , महाविद्यालयाचे प्राचार्य, डाॅ. अंजन नायडू यांनी आपल्या मार्गदर्शनात विविध विषयांच्या विध्यार्थी समित्या असणे गरजेचे आहे , तसेच या समित्यांमार्फत विद्यार्थी केंद्रित उपक्रम सातत्याने राबवणे गरजेचे आहे असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे उदघाटक डाॅ. संजीव पाटणकर यांनी मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी , इंडिया द्वारे संचालित विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली , तसेच शुक्ष्मजीवशात्र विषयात असणाऱ्या विविध संधीबद्दल मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शक महेंद्र ठाकूर ,संचालक रुची बायोकेमिकल्स, गोंदिया यांनी शुक्ष्मजीवशास्त्र विषयातील विद्यार्थ्यां करीता उद्योग निर्मितीच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संयोजक प्रा. धर्मवीर चौहान यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. या क्रमात२५० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. डाँ . स्नेहा जायस्वाल-शुक्ष्मजीवशास्त्र विभाग यांनी आभार मानले तर सूत्र संचालन कु अवनी मेठी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.