शिक्षणाधिकारीसह गटशिक्षणाधिकारी पोचले मुरकुटडोहला

0
32
मुरकुटडोह येथील शाळेची पाहणी करतांना शिक्षणाधिकारी डाॅ.महेंद्र गजभिये
मुरकुटडोह दंडारीच्या बंद शाळा सुरु करण्याच्या हालचालींना वेग
गोंदिया,दि.01– जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर बसलेल्या अतीदुर्गम नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखले जाणारे मुरकुटडोह 1,2 , दंडारी व टेकाटोला येथील शाळा तीन वर्षापासून बंद पडल्याने गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यासंदर्भातील वृत्त बेरार टाईम्सने तीन वर्षापासून शाळा बंद या मथळ्याखाली प्रकाशित केले होते.त्या वृत्ताची दखल जिल्हा प्रशासनाने घेत त्या बंद शाळा सुरु करण्यासाठीच्या हालचालींना सुरवात केली आहे.गोंदिया जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ.महेंद्र गजभिये यांनी सर्व शिक्षा अभियानाच्या चमूसह 31 मे रोजी तर सालेकसा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विशाल डोंगरे यांनी प्रत्यक्ष त्या गावांना 30 मे रोजी भेट देत तेथील नागरिकांशी सवांद साधला तसेच बंद शाळेची पाहणी सुद्दा केली.

सालेकसा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विशाल डोंगरे ग्रामस्थांची संवाद साधतांना
या पाहणी दरम्यान गावातील नागरिक हे रोजगार हमी योजनेच्या कामावर गेले असल्याने गावात कुणीही मिळाले नाही,त्यामुळे गटशिक्षणाधिकारी डोंगरे यांनी प्रत्यक्ष रोहयोचे काम सुरु असलेले स्थळ गाठत त्यांच्याशी  शाळा सुरु करण्यासंबधीच्या त्यांच्या भावना जाणून घेतल्या.यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य गीता लिल्हारे,पंचायत समिती सदस्य अर्चना मडावी,सुनिता राऊत,ओमप्रकाश लिल्हारे, एस.टी.लांजेवार, संदीप राऊत,जमुना मरकार,जी.के.मडामे हे सुध्दा उपस्थित  होते.