अस्वलाचे अख्खे कुटुंब कॅमेऱ्यात कैद

0
18

भंडारा : जंगलातील अस्वले मधमाश्यांच्या पोळ्यातील मध काढून त्याची भाकरी करतात आणि मग त्या खातात, असे कुणी सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही ना! नागझिऱ्यातील अस्वलांना मात्र ही सवय आहे. नवेगाव-नागझिऱ्यात वनखात्यात अनेक वर्षे सेवा देणारे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे हे निरीक्षण त्यांनी एका पुस्तकात दिले आहे. नागझिरा अभयारण्याचे पर्यटक मार्गदर्शक अमित डोंगरे यांनी भाकरीसाठी रस्ता ओलांडणाऱ्या अस्वलांचे अख्खे कुटुंब कॅमेऱ्यात कैद केले आहे