धोटे बंधू महाविद्यालयास सीपीई मानांकन

0
11

गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्लीद्वारे ‘कॉलेज विथ पोटेंशियल फॉर एक्सलेंस’ (सीपीई) मानांकन देण्यात आले. सदर मानांकन प्राप्त करणारे जिल्ह्यातील हे एकमेव महाविद्यालय आहे. आता धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयास विविध उपलब्धी प्राप्त आहेत. यात सीपीई, कार्यक्षमता, अ श्रेणी, सेंटर फॉर हायर लर्निंग अँन्ड रिसर्च, कम्युनिटी कॉलेज व व्होकेशनल सेंटरचा समावेश आहे. याबाबत प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांनी सांगितले, या महाविद्यालयात अध्ययण करणारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करविण्याच्या दृष्टिकोनातून ते शहरी विद्यार्थ्यांच्या समतूल्य होवू शकतील. सदर महाविद्यालयाने विविध उपलब्धी प्राप्त केल्यामुळे खा. प्रफुल्ल पटेल, वर्षा पटेल, आ. राजेंद्र जैन यांनी आनंद व्यक्त केला. महाविद्यालयाला यश मिळवून देण्यासाठी प्राचार्य नायडू यांच्या मार्गदर्शनात सीपीई समन्वयक डॉ. दिलीप चौधरी व सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केले.