काँग्रेसचा ७ मे रोजी मोर्चा

0
8

गोंदिया : भू माफिया, रेती माफिया व जिल्ह्यात होणारी गुंडागर्दी यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर पत्रपरिषदेदरम्यान झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे षड्यंत्र रचणार्‍यांविरूद्ध कठोर कारवाई करण्यात यावी व आरोपींना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीद्वारे शनिवार (दि.७) निषेध मोच्र्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर निषेध मोर्चा दुपारी २ वाजता सर्कस मैदानातून सुरू होऊन डॉ. गुप्ता रूग्णालय, गुरूनानक गेट, गांधी चौक, चांदणी चौक, दुर्गा चौक, गोरेलाल चौक, श्री टॉकिज, जैन मंदिर होत नेहरू चौकात पोहोचेल. तेथे जाहीर सभा घेण्यात येईल. त्यानंतर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते आ. अग्रवाल यांच्या झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे हल्लेखोर व षडयंत्रकारी यांना त्वरित अटक व जिल्ह्यातील वाढणार्‍या गुन्हेगारीस रोक लावण्यासाठी जिल्हा प्रशासनास निवेदन देणार आहेत. मोच्र्यात मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.