जिचकार मॉडेल स्कूलमध्ये उन्हाळी शिबिराचा समारोप

0
10

आमगाव : जवळील ग्राम किडंगीपार येथील श्रीकांत जिचकार मॉडेल स्कूलमध्ये आयोजीत उन्हाळी शिबिराचा समारोप रविवारी अँड. राजीव देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष के.बी.चव्हाण, संस्था सचिव विजय बहेकार, अश देशपांडे, मुख्याध्यापक चंद्रकुमार पटले उपस्थित होते. १६ एप्रिल पासून आयोजीत या शिबिरात विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी अँड.देशपांडे यांनी, विद्यार्थ्यांना अशाचप्रकारे नवनवीन वस्तू शिकून सतत पुढे वाढत राहण्याचे आवाहन केले. दरम्यान उपस्थित पाहुण्यांनीही विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे कलागुण आत्मसात करून परिपूर्ण होण्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी माजी राज्यसभा सदस्य निर्मला देशपांडे यांना पुण्यतिथीनिमित्त दोन मिनिटांचे मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दरम्यान शिबिरात भाग घेणार्‍या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. संचालन करून आभार महेश भालोटिया यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. (