कामठा सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी दहिकार

0
14

गोंदिया : तालुक्यातील ग्राम कामठा येथील सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी मनोज चंदनलाल दहिकार तर उपाध्यक्षपदी टिकाराम रतिराम भाजीपाले अविरोध निवडून आले.
संस्थेची निवडणूक ३एप्रिल रोजी घेण्यात आली होती. या निवडणूकीत सहकार पॅनलचे सर्व १३ उमेदवार निवडूण आले होते. दरम्यान सोमवारी (दि.२) संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीत अध्यक्षपदी मनोज दहिकर तर उपाध्यक्षपदी टिकाराम भाजीपाले अविरोध निवडून आले.यावेळी संस्थेचे संचालक संतोष बिसेन, गोपीनाथ मोहाळकर, योगराज आसोले, हमिद कुरैशी, डॉ. सदासतकर गजभिये, देवलाल लिल्हारे, रंजित पाटील अनिल वाघाडे, सुशिला खरकाटे, कमला भाजीापले आदी उपस्थित होते. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूकीच्या वेळी निवडणूक अधिकारी म्हणून रमाशंकर पांडे यांनी तर सचिव डी.बी.जांभूळकर, बँक निरीक्षक बंसोड यांनी कामकाज सांभाळले.