रिसोड-५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून जगदंबा इन्फोटेक,लोणी यांच्या वतीने श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,मोप येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी १५ ऑगस्ट दिना निम्मित ५ वी ते १२ वी च्या विदयार्थ्यांची जगदंबा इन्फोटेक द्वारा प्रश्नमंजूषा घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना जगदंबा इन्फोटेक लोणी यांच्या वतिने काही पारितोषिक आयोजित करण्यात आले होते. शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेतील शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्कूल बॅग देण्यात आली. यामध्ये ५ वी ते १० वी एक गट व ११ वी व १२ वी एक गट असे पारितोषिके देण्यात आली. त्याचबरोबर सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त जगदंबा इन्फोटेक,लोणीचे संचालक भारत घाणे सर यांच्या द्वारा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच एम.के.सी.एल. प्रतिनिधी शंकर पातळे यांनी विद्यार्थ्यांना आय टी स्किल विषयी मार्गदर्शन केले. व जगदंबा इन्फोटेकचे संचालक भारत घाने यांनी करिअर मार्गदशन केले. यावेळी कार्यक्रमाला प्रमूख उपस्थिती शाळेचे प्राचार्य व्ही.जी.मोरे पर्यवेक्षक एस.डी लांडगे जेष्ठ शिक्षक गुलाबराव खडसे , प्रा.समाधान गायकवाड व शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजेश बलकार यांनी केले.