सेंट फ्रांसेस टी.एस.के. इंग्लिस स्कूल, चंद्रपुर येथील खेळाडूं राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत निवड

0
1

चंद्रपूर : नागपुर ( खापरखेड़ा ) येथे होणाऱ्या १४ वी राज्यस्तरीय सब ज्युनिअर ( मुले व मूली ) टेनिस बॉल क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा दिनांक ०८ ते १० सप्टेंबर २०२३ रोजी संपन्न होत आहे. या स्पर्धेकरिता सेंट फ्रांसेस टी.एस.के. इंग्लिस स्कूल, चंद्रपुर येथील खेळाडूंची चंद्रपूर जिल्हा सिटी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन चंद्रपूर जिल्ह्याच्या संघात निवड झालेली आहे. २० ऑगस्ट २०२३ रोजी सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपुर येथे झालेल्या निवड चाचणी मधे आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करुण सेंट फ्रांसेस टी.एस.के. इंग्लिस स्कूल, चंद्रपुर येथील खेळाडूंनी चंद्रपूर जिल्हा सिटी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन चंद्रपूर जिल्ह्याच्या संघात आपले स्थान निश्चित केले. सदर सब ज्युनियर मुलींच्या संघात  समीक्षा काठोर ( कर्णधार ), जास्मिन शेख, ऐश्वर्या बेहरा, संस्कृति खोटे, अलवीना शेख, पूर्वा कडु, स्वरा मून, प्राची गड्डमवार, अधिक्षा खाड़े, आफिन काझी, संचिता ठाकुर, , मानसी डंडेले तसेच सब ज्युनियर मुलांच्या संघात रेहान खान ( कर्णधार ), मयंक तेलंग, वेदांत फले, ईमरान शेख, सौरभ सिंह, शार्दुल घोड़मारे व द्विज मेंढे इत्यादी खेळाडूंचा समावेश आहे. या संघात निवड झालेल्या खेळाडूंचे प्रशिक्षण म्हणून ईखलाख रसूल खा पठान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले

               खेळाडूच्या यशाबद्दल सेंट फ्रांसेस टी.एस.के. इंग्लिस स्कूल, चंद्रपुर येथील मुख्याधापिका मर्सी फ्रांसिस कुमार, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख ईखलाख रसूल खा पठान, सहाय्यक शारीरिक शिक्षण प्रदीप गेडाम स्पोर्टीव संस्थेचे सचिव संदीप गुड़ीमुल्ला तसेच शाळाचे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी  यांनी सुध्दा खेळाडूचे कौतुक करून अभिनंदन केले .