स्व ब्रीजलालजी कटरे हायस्कूल शहरवाणी शाळेत” आजी – आजोबा दिवस “व “वृक्ष संवर्धन कार्यक्रम” साजरा

0
3

गोरेगाव,दि.17- तालुक्यातील स्व.ब्रीजलालजी कटरे हायस्कूल शहारवाणी येथे ” आजी – आजोबा दिवस” साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आजोबा देवचंद पटले तसेच शाळेचे मुख्याध्यापक आर.वाय.कटरे प्रमुख अतिथी प्यारेलालजी तुरकर ,योगराज पटले,महादेव बांगरे,बाबूलाल दियेवार हे होते.
यावेळी प्रथमतः माॅ शारदा माता यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी व सर्व आजी आजोबा यांनी केले .त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कडून आजी आजोबा यांचे टीका लावून पूजन करण्यात आले व मिठाई देवून तोंड गोड करण्यात आले.
अनेक आजी आजोबा यांनी आपल्या जीवनात आलेले अनुभव, कथा, गाणं आमच्या विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आजी आजोबा यांचे जीवनात नातवंडांच महत्व व मुलांच्या जीवनात आजी-आजोबा यांचे महत्त्व काय असते ते पटवून सांगितले.या कार्यक्रमाला सर्व शालेय विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कू.ओ.बी.ठाकरे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन .के.के यादव यांनी केले.अशाप्रकारे हा कार्यक्रम अतिशय आनंदात व उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमात आजी आजोबा यांच्याकरिता संगीत खुर्ची ,खो-खो व १०० मीटर दौड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर संगीत खुर्चीमध्ये प्रथम क्रमांक पुष्पाबाई बिजेवार,
आजोबा गटांमध्ये योगराजजी पटले ,100 मीटर दौंड मध्ये आजोबा गटात प्यारेलालजी तुरकर आजी गटात प्रमिलाबाई तुरकर यांनी पटकावला व खो खो यामध्ये काही मोजक्या आजोबांनी भाग घेतले.प्रथम क्रमांक येणाऱ्या स्पर्धकांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.आयोजित सर्व स्पर्धेत सर्व आजी आजोबा यांनी विद्यार्थ्यांचे मन जिंकले व त्यांचा जून्या आठवणींना उजाळा मिळाला.तदनंतर ए.वाय.टेंभरे यांच्या नियोजनानुसार शाळेत लावलेल्या झाडांचे विद्यार्थ्यांना नीगा,सेवा व संवर्धन करण्याकरिता गटानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांना झाडे वाटप आजी आजोबा यांचे उपस्थित करण्यात आले व शेवटी सर्वांना अल्पोहार देन्यात आले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.