अमरावती : सुटीचा दिवस असल्याने पर्यटनस्थळी जाण्याचे नियोजन करून स्वतःची कर घेऊन चिखलदरा येथे पर्यटनासाठी निघाले होते. मात्र कारवरील नियंत्रण सुटल्याने थेट १०० फूट खोल दरीत कोसळली. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. परतवाडा ते चिखलदरा मार्गावर मोथा गावाजवळहा भीषण अपघात झाला आहे. मृतक व जखमी हे आंध्रप्रदेश येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुटी असल्याने फिरायच्या निमित्ताने चिखलदरा येथे पर्यटनासाठी ७ जण कारमध्ये निघाले होते. परंतु पर्यटनस्थळी पोहचण्यापूर्वीच त्यांच्या कारचा अपघात झाला. घाट रस्ता असल्याने येथे कार अनियंत्रित होऊन कार थेट खोल दरीत कोसळली.