अर्जुनी मोरगाव तालुका विज्युक्टा कार्यकारिणी गठित

0
11

अर्जुनी मोर.-येथील सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अर्जुनी मोरगाव येथे विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन (विज्युक्टा) सहविचार सभा, सत्कार समारंभ व अर्जुनी मोरगाव तालुका कार्यकारिणीची निवडूक संपन्न झाली.सभेचे अध्यक्षस्थान विज्युक्टाचे जिल्हाध्यक्ष प्रा पोमेंद्रकुमार (पवन) कटरे यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय कार्यकारिणीचे माजी उपाध्यक्ष प्रा.शशिनिवास मिश्रा, माजी जिल्हाध्यक्ष प्रा.मो.गुलाम दस्तगीर,प्रा.रोमेंद्र बोरकर,जिल्हा सचिव प्रा.अरविंद शरणागत,जिल्हा उपाध्यक्ष प्रा.संजय कळंबे,प्राचार्य जे.डी.पठाण प्रामुख्याने उपस्थित होते .या बैठकीत खालील प्रमाणे तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली.
अध्यक्ष-प्रा.टि.एस.बिसेन,सचिव- प्रा.डी.डब्ल्यू.जांभूळकर,उपाध्यक्ष प्रा.आर.एन.दिघोरे प्रा.प्रमोद चाचेरे
कोषाध्यक्ष: प्रा.वाय.ए.गौतम,संघटन सचिव: प्रा.प्रेम लंजे,प्रसिद्धी प्रमुख: प्रा.भुवेद्र चव्हाण,सहसचिव: प्रा.एस.एस.शहारे,
प्रा.सौ.दर्शना कापगते, प्रा.ए.एल.लांजेवार,प्रा दिपक झोडे,प्रा.महेश खुणे,कार्यकारिणी सदस्य प्रा.संतोष बिसेन ,
प्रा.वाय.जे.रामटेके, प्रा.कोकोडे मॅडम ,प्रा एस.एन भावे,प्रा.तारकनाथ माटे,प्रा.सुशिल ठाकरे ,प्रा.एस.जे.लंजे,प्रा.ओ.डी.लांजेवार,प्रा.हिवराज साखरे,मोतीलाल बिसेन,प्रा.यु आर.तांदळे,प्रा. कु.एन.एच.लाडसे यांची निवड करण्यात आली.
निवडणूक अधिकारी म्हणून केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. जागेश्वर भेंडारकर व जिल्हा उपाध्यक्ष प्रा.सुनिल लिचडे यांनी भूमिका पार पाडली.माजी तालुका अध्यक्ष प्रा. फुलकटवार व माजी सचिव प्रा बी.जी पटले यांनी संघटनेचा कार्यभार व जबाबदारी नवनिर्वाचित अध्यक्ष व सचिव यांच्याकडे सोपवली .
तालुक्यातील सेवानिवृत्त कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा सत्कार देखील करण्यात आला.प्रा.रामदास सुर्यवंशी, प्रा.सिंगणजुडे, प्रा.बोरकर,प्रा एन.एस.लंजे, प्रा गोवर्धन लंजे यांचा सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला . सदर सहविचार सभा व निवडणूक विषयक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा काशिवार यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. टि.एस.बिसेन यांनी केले.