विद्यार्थ्यांनी बहुमुखी क्षेत्रात यश संपादन करावे–डॉ. विजय कटरे

0
14

गोरेगाव – विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच वैज्ञानिक, सामाजिक,राजकीय व कला संस्कृती क्षेत्रात यश संपादन करून देशाची सेवा करावी असे प्रतिपादन डॉ.विजय कटरे यांनी स्थानिक पी डी रहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या बक्षीस वितरण सोहळ्यात व्यक्त केले.

या कार्यक्रमात डॉ. स्वीटी ओम बघेले, डॉ. जितेंद्र येडे, डॉ. वैभव तुरकर, डॉ साक्षी तुरकर, प्राचार्य सी डी मोरघडे,पर्यवेक्षक ए एच कटरे, सौ. एस पी तिरपुडे,पत्रकार सौ. लिचड़े, सौ. लक्ष्मीताई रहांगडाले, सौ. शारदा रहांगडाले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सौ.एम डी रहांगडाले,सौ.एस आर मांढरे, प्रा. सी आर बिसेन यांनी संयुक्तपणे केले तर आभार पर्यवेक्षक ए एच कटरे यांनी मांडले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सौ. ए एस बावनथडे, कुमारी जयश्री पारधी, आर टी पटले, वाय के चौधरी, जी डब्ल्यू रहांगडाले, प्रा एस एम नंदेश्वर, प्रा. डी बी चाटे,प्रा. डी एम राठोड, श्री. भुमेश रहांगडाले, कु. एस जी दमाहे, एस आर रहांगडाले, प्रा. ए जे सोरले, प्रा. जे वाय बिसेन, एम बी कोटांगले, झेड सी राऊत शाळा नायक कु. दिया येळणे, कु. रोशनी सरजारे, कु. राधिका रहांगडाले, प्रतिक रहांगडाले, यश रहांगडाले, प्रेम ओंकार, कु. तसलीम कुरेशी, कॉलेज नायक मोहित गौतम, मयुरी वाघाडे, आलेमा पठाण, कार्तिक उके, आरती शेंद्रे, माधुरी ठाकरे, दुर्गेश सोनवणे व सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.