चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८३.३१ टक्के;मृणालिनी चौधरी जिल्ह्यात पहिली

0
29

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८३.३१ टक्के लागला. ऊर्जानगर येथील विद्या विहार कॉन्व्हेंट हायस्कूलची विद्यार्थिनी मृणालिनी चौधरी ही ९६.६0 टक्के गुण घेऊन जिल्ह्यात पहिली आली आहे. तिच्या पाठोपाठ ख्रिस्तानंद हायस्कूल ब्रह्मपुरी येथील सुयोग रामटेके हा विद्यार्थी ९६.४0 टक्के गुण घेऊन प्रथम आला आहे तर विद्याविहार कॉन्व्हेंट हायस्कूलचीच तनुश्री धांडे ही ९६.२0 टक्के गुण घेऊन तिसरी आली आहे.
विदर्भातील निकालात चंद्रपूर जिल्हा सहाव्या क्रमांकावर आहे. मागील तीन वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही दहावीत मुलींनीच बाजी मारून मुलांच्या तुलनेत अव्वल राहिल्या.
चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण ४६0 शाळांमधून ३३ हजार १५७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील ३३ हजार ३५ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. यापैकी एकूण २७ हजार ५२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील तब्बल तीन हजार ८0३ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले आहे. १0 हजार ३६१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. १0 हजार ९२६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर दोन हजार ४३३ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल सहाव्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी चंद्रपूर जिल्हा निकालात पाचव्या क्रमांकावर होता.