पाच जिल्ह्यांची एकत्रीत धान परिषद

0
12

खासदार प्रङ्कुल्ल पटेल : शरद पवारांसह तज्ज्ञांची उपस्थिती
गोंदिया- : भाजप सरकारने धान उत्पादकांची थट्टा मांडली. केवळ ४० ते ६० रुपये भाववाढ धानाला देण्यात येत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च देखील निघणे कठीण झाले. धान उत्पादकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देण्याच्या उद्देशाने येत्या डिसेंबर ‘हिन्यांत पाच जिल्ह्यांची एकत्रीत धान परिषद घेण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रङ्कुल्ल पटेल यांनी दिली.
सत्कार समारंभाकरिता रविवारी(ता. ५) येथे आले असता पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. खासदार प्रङ्कुल्ल पटेल पुढे म्हणाले, राज्य आणि केंद्रातील भाजप सरकार विकासकामाऐवजी घोषणाबाजीवर लक्ष केंद्रीत करत आहे. त्यामुळे स‘ाजातील प्रत्येक घटक या सरकारच्या का‘काजावर नाखूश आहे. उद्योजक, शेतकरी, सर्वसामान्य माणूस आणि नोकरदार साèयांचीच या दोन वर्षांत घोर निराशा झाली. ‘अच्छे दिनङ्कच्या घोषणांना बळी पडून नागरिकांनी भाजपला सत्ता दिली. मात्र, राज्य आणि केंद्रातील सरकारने ‘तदारांच्या अपेक्षांवर पाणी ङ्केरले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात दूरदृष्टी आहे. त्यांना प्रत्येक क्षेत्राची इत्थंभूत माहिती आहे. शेती क्षेत्रात त्यांच्यासारख्या तज्ज्ञांची गरज आहे. केंद्र शासनाने धान उत्पादक शेतकèयांची थट्टा मांडली. शेतमालाला भाव नाही. शेतकèयांच्या या प्रश्नांना वाचा ङ्कोडून शास्वत शेतीचे धडे देण्याच्या दृष्टीने येत्या डिसेंबर ‘हिन्यात पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांतील धान उत्पादक शेतकèयांची धान परिषद घेण्यात येणार आहे. या परिषदेला मोठे नेते आणि ज्येष्ट मार्गदर्शक येणार असल्याची माहिती खासदार प्रङ्कुल्ल पटेल यांनी दिली.

गोंदिया मेडीकल कॉलेजमध्ये पुन्हा १३ त्रुट्या
मेडीकल कॉलेजमध्ये पुन्हा १३ त्रुट्या एमसीआयने काढल्याची माहिती आपणास मिळाली आहे.त्यासंदर्भात येत्या गुरुवारी किवां शुक्रवारी दिल्लीला जाऊन चौकशी करणार आणि यावर्षीच मेडीकल कॉलेज सुरु होण्यासंबधी प्रयत्न करणार असे पटेल म्हणाले.