गोंदिया,दि.27-येथील ॲक्यूट पब्लिक शाळेत ७५वा गणतंत्र दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. २६ जानेवारी गणतंत्र दिवस हा प्रत्येक भारतीयसाठी राष्ट्रीय सण आसून याच दिवसी २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानाची अंबलबजावणी झाली. प्रजासत्ता दिन हा देशाच्या स्वतंत्र अखंडतेचा प्रतिक आहे. कार्यक्रमाची सुरूवात द्वाजारोहण करून राष्ट्रगीताने करण्यात आली. द्वाजसलामी देऊन भारतीय प्रजासत्ता दिन चिरायु हावे, असा जयघोष करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम प्रस्तुत केले. विद्यार्थ्यांनी ड्रिल नृत्य मनोरे सादर केले. स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी मार्च पास आणि प्रार्थना सादर केली. प्रश्न मंचूषा कार्यक्रम, सामान्य विज्ञान प्रदर्शनी लावण्यात आली.
तसेच या कार्यक्रमा प्रसंगी विद्यालयात वर्षाभारी राववण्यात आलेल्या विविध उपक्रम, क्रीडा, परीक्षा स्पर्धा माध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी बक्षिस देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला.
या गणतंत्र दिवसाच्या कार्यक्रम प्रसंगी संज्योत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती गीताताई भास्कर,संस्थेचे सचिव संजय भास्कर, सह सचिव श्रीमती एस. शुभा, कटंगीकला सरपंच मोहिनी वरहाडे, मुख्याध्यापक श्री कापगते, मुख्याध्यापिका उज्ज्वला पारधी , शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपास्थित होते. तसेच विद्यार्थ्यांचा उत्साला दिविगुणित करण्यासाठी पालकांनी मोठ्या संख्येंने उपस्थित दर्शविली. कार्यक्रमाची सांगता “वंदे मातरम” च्या गीताने करण्यात आली.