पंधरा वर्षापासून प्रलंबित वनहक्के पट्टे लाभार्थ्यांना त्वरित वितरित करा:- दानेश साखरे

0
8

अर्जुनी मोर.-पंधरा वर्षापासून प्रलंबित असलेले वन हक्क पट्टे लाभार्थ्यांना त्वरित वितरण करा. दोन वर्षापासून बंद असलेली आदिवासींच्या हक्काची खावटी योजना त्वरित सुरू करा, नगरपंचायत क्षेत्रात ग्रामपंचायत स्तरावरील वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ नागरिकांना लागू करा अशा विविध मागण्या अर्जुनी मोरगाव नगरपंचायत चे नगरसेवक दानेश साखरे यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे निवेदन देवुन केली आहे.
अर्जुनी मोर. पंचायत समिती च्या प्रशासकिय इमारतीचे लोकार्पण करण्यासाठी पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम आज ता.२५ जानेवारीला अर्जुनी मोर. येथे आले असता त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनानुसार वन हक्क कायदा २००५ नुसार शासनाने आदिवासी वनवासी व इतर पारंपारिक वन निवासी यांना वन हक्काच्या पट्ट्यांसाठी प्रस्ताव मागविले. सदर प्रक्रिया मागील पंधरा वर्षांपासून प्रलंबित आहे. परिणामी या लाभार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजना बाबत अडचणी निर्माण होत आहेत. सदर प्रक्रियेची गती वाढवून वन हक्क पट्टे त्वरित लाभार्थ्यांना वाटप करण्यात यावे, तसेच आदिवासीच्या हक्काची खावटी योजना गेल्या दोन वर्षापासून बंद आहे. सदर योजना पूर्ववत सुरू करून गरीब आदिवासी गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी योग्य कारवाई करण्यात यावी, राज्य सरकारने महाराष्ट्रातील तालुकास्तरावरील सर्व ग्राम पंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा बहाल केला. त्यानुसार अर्जुनी ग्रामपंचायतचे सन २०१५ ला नगरपंचायत मध्ये रुपांतर झाले. ग्रामपंचायत काळात या क्षेत्रातील नागरिकांना शासनाच्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजना चा लाभ मिळत होता. ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर झाल्याबरोबर शहरी भागाच्या नावाखाली नागरिकांना मिळणारे योजना गोठवण्यात आल्या, ग्रामपंचायती नगरपंचायत मध्ये रूपांतर झाले म्हणजे स्थानिक लाभार्थ्यांचा आर्थिक स्तर उंचावला असा शासनाचा समज असावा, मात्र नागरिकांची परिस्थिती बेतांची आहे सन २००९ पासून वन हक्काचे प्रकरणे प्रलंबित असल्याने हजारो लाभार्थी शासकीय योजना पासून वंचित आहेत. ही प्रकरणे तात्काळ निकाली काढावी, आजही नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांची स्थिती जैसे थे आहे. आपण आदिवासीबहुल क्षेत्रातील प्रतिनिधित्व करीत आहात. या क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेच्या समस्याशी आपण परिचित आहात. आपणास नगरवासी यांचे वतीने विनंती करण्यात येत आहे की जनहिताच्या मुद्द्यावर आपण शासन दरबारी पाठपुरावा करून जनतेला न्याय मिळवून द्यावा सोबतच क वर्गाच्या नगरपंचायत स्तरावर बंद असलेली मनरेगाची कामे सुरू करावी, जिल्हा नियोजन समिती आणि समाज कल्याण विभागामार्फत मिळणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना त्वरित सुरू कराव्यात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि धडक सिंचन योजनेचा लाभ सुरू करावा, आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने मिळणारे लाभ सुरू करण्यात यावे, शौचालय घरकुलाचा लाभ नमुना आठ अ नुसार देणे आणि अखीवपत्रिकेची अट रद्द करून लाभाच्या योजनांची गती वाढवण्यात यावी, पशुसंवर्धन कृषी विभाग आणि महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ सुरू करण्यात यावा, वन हक्क कायद्यातील 75 वर्षाची अट रद्द करून अतिक्रमण धारकांची प्रकरणे त्वरित निकाली काढावी, पंतप्रधान आवास योजनेचे अंतिम टप्प्याचे देयके लाभार्थ्यांना त्वरित वाटप करण्यात यावे, रखडलेली झाशीनगर उपसा सिंचन योजनेला गती देण्यात यावी, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात यावा, इटियाडोह धरण क्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात यावा, अर्जुनी नगरपंचायत क्षेत्रातील गाव तलाव आणि स्मशानभूमी तलाव सौंदर्य करणासाठी नीधी उपलब्ध करून देण्यात यावा, असे विविध मागण्या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारकडे उचित कारवाईसाठी आपण पाठपुरावा करून या नगरपंचायत स्तरावरील व गाव स्तरावरील समस्या निकाली काढण्यासाठी आपण मदत करावी अशी मागणी ही अर्जुनी मोरगाव नगरपंचायत चे नगरसेवक दानेश साखरे यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .