शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयातील विद्याथ्याचे विद्यार्थी नवकल्पना आव्हानात यश

0
7

गोंदिया,दि.27-महाराष्ट्र कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग कडून राज्यातील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी महाराष्ट्र शासन तर्फे आयोजित केलेल्या महाराष्ट्र स्टुडन्ट इनोव्हेशनल चॅलेंज जिल्हास्तरीय स्पर्धेत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयातील वैभव सोहनलाल कापगते बीएससी अंतिम वर्ष च्या विद्यार्थ्याची जिल्हा स्तरीय विनर म्हणून निवड करण्यात आली.त्याला 26 जानेवारी 2024 ला गोंदिया जिल्हाचे पालकमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र व एक लाख रुपयाचे बीजभांडवल म्हणून प्राप्त झाले. त्यांनी भौतिक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. द्वारपाल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रीयुझ आफ ई वेस्ट ईन अदर इलेक्ट्रॉनिक डिवैसेस या विषयावर प्रकल्प सादर केला. दिनांक 23 नोव्हेंबर ते 22 डिसेंबर दरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्तरावरील मूल्यांकनानुसार व मार्गदर्शक तत्त्वातील निकषाद्वारे वैभव कापगते याने सादर केलेल्या इनोव्हेशन मॉडेलची जिल्हा स्तरीय विनर म्हणून निवड करण्यात आली. सदर इनोव्हेशन मॉडेल तयार करण्याकरता प्राचार्य डॉ ईश्वर मोहुर्ले,प्रा. पंकज उके यांचे सहकार्य लाभले. सदर यशाचे श्रेय महाविद्यालयाचे व्यवस्थापन मंडळ, प्राचार्य, इनोव्हेशन व इंक्युबॅशन समिती, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिले.