कोवळ्या वयात मोबाईलमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता

0
4

देवरी – सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असून मोबाईलपेक्षा अभ्यासाचे व संस्काराचे युग असून विद्या भारतीच्या शाळा सुद्धा एक प्रकारचे संस्कार केंद्र आहेत. त्यामुळे, बालपणापासूनच विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल दिल्याने मोबाईल जास्त आणि अभ्यास कमी होतोय. वरुन कोवळ्या वयात मोबाईलमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते, असे प्रतिपादन माजी आमदार यांनी नुकत्याच झालेल्या विद्या भारती संलग्नित सरस्वती शिशु मंदिराच्या तीन दिवसीय वार्षिक स्नेह संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी उदघाटक म्हणून पालकांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नगर पंचायतचे अध्यक्ष संजय उईके, प्रमुख उपस्थितीत संघाचे तालुका संघचालक विष्णूप्रसाद अग्रवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष छोटेलाल बिसेन, विद्या भारतीचे विदर्भ सहप्रमुख मनोज भुरे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राजू शाहू , पालक समितीचे अध्यक्ष विनोद खळसिंगे, माजी अध्यक्ष बाबासाहेब होनमाने, सामाजिक कार्यकर्ते शंकर माडे, संतोष बहेकार, प्रभू माडे, संस्थेचे सचिव सुरेश चन्ने, सहप्रधानाचार्या अनिता चन्ने यांची प्रमुख उपस्थिती होती.
तर, विद्यार्थ्यांच्या कला व गुणांना वाव मिळण्यासाठी आयोजीत स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक शांकी भाटीया यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
यावेळी संस्थेचे सल्लागार सदस्य ॲड. प्रशांत संगीडवार, जि. प. माजी सदस्या पारबता चांदेवार, पं. स. माजी सदस्या अर्चना ताराम, मुख्याध्यापिका ज्योती रामटेककर, शिल्पा बांते, नगर सेवक शकील कुरेशी, विहिंपचे तालुका प्रमुख राजकुमार शाहू , धर्म जागरण प्रमुख पवन अग्रवाल, माजी पालक प्रमोद निखाडे, प्रगती निखाडे, शोभा चांदेवार, भाजप विद्यार्थी मोर्चाचे तालुकाध्यक्ष दिशांत चन्ने, उपाध्यक्ष दिपक शाहू यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुन्हा दरवर्षीप्रमाणे शाळेचा नाव लौकीक करणारे पाच माजी विद्यार्थ्यांचा पण सत्कार करण्यात आला.
सर्व कार्यक्रमांचे प्रास्ताविक प्रधानाचार्य सुरेश चन्ने यांनी मांडले. संचालन ममीता वगारे यांनी केले असून उपस्थित सर्वांचे आभार शशीकला चांदेवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी शालू बारसागडे, उपासना बहेकार, ममीता वगारे, ज्योती बारसागडे, दमयंती कलचार, शशीकला चांदेवार, लता बारसे, मनिषा थोटे, ममीता हटवार आणि पालक वर्ग आदींनी सहकार्य केले.