गोंदिया,दि.7-विद्यार्थी दशा ही जीवनाचा पाया असून शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच शिस्त बाळगली तर हमखास यश मिळेल,असे प्रतिपादन गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी व्यक्त केले.जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण त्यांचे हस्ते करण्यात आले.त्याप्रसंगी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.आमच्याकडे आलेला गुन्हेगार हा चांगले शिक्षण,उत्कृष्ट संस्कार व उत्तम शिस्त न मिळाल्याने बनलेला असतो.चांगला नागरिक घडविण्यासाठी म्हणून आमच्यापेक्षा शिक्षकांची भूमिका फार मोलाची असते.विज्ञानाचा चांगला वापर करणारा माणूस घडविण्यासाठी शिक्षकांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
समारंभाचे अध्यक्ष डायटचे प्राचार्य डॉ.रमेश राऊत यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जनार्दन खोटरे, मारवाडी युवक मंडळ संस्थेचे पदाधिकारी श्री अग्रवाल व श्री दादरीवाल हे उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक करताना शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी यशस्वी शाळांचे अभिनंदन करुन राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी उत्तम तयारी करण्याचे आवाहन केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुढील यशस्वी शाळांच्या विद्यार्थी व शिक्षकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.उपशिक्षणाधिकारी दिघोरे यांनी सर्वांचे आभार मानले.
उच्च प्राथमिक गट
१) कुमारी परिणीता गजानन नाकाडे, सरस्वती विद्यालय अर्जुनी मोरगाव (प्रथम)
२) कुमारी पूर्वा राहंडाले, छत्रपती विद्यालय पांढरी (द्वितीय)
३) विष्णू रेखलाल पटले, श्रीहरीरामजी अग्रवाल विद्यालय रजेगाव (तृतीय)
आदिवासी उच्च प्राथमिक गट
१) कुमारी तनवी शिलास बडोले, पंचशील हायस्कूल मक्काटोला (प्रथम)
माध्यमिक उच्च माध्यमिक गट
१) कुमारी जानवी राजकुमार चौधरी, हरिहर भाई पटेल हायस्कूल चिरचालबांध (प्रथम)
२) कुमारी दिव्या पंढरी, सीता पब्लिक स्कूल देवरी (द्वितीय)
३) राज हंसलाल चौधरी, विमलताई हायस्कूल कटंगी कला (तृतीय)
आदिवासी माध्यमिक उच्च माध्यमिक गट
१) टिकेश योगराज कटरे, नारायण भाऊ बहेकार हायस्कूल लोहारा (प्रथम)
प्राथमिक शिक्षक गट
श्री एल वाय चौरावार, शहीद मिश्रा विद्यालय तिरोडा (प्रथम)
माध्यमिक शिक्षक गट
श्री एच ए नालाट, जिल्हा परिषद भारतीय विद्यालय एकोळी (प्रथम)
प्रयोगशाळा परिचर / सहाय्यक गट
कुमारी एस ए चव्हाण, जिल्हा परिषद हायस्कूल तिरोडा (प्रथम)