अर्जुनी मोरगाव,दि.10-तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुकुमनारायण येथे आयोजित स्नेहसंमेलनाचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांच्या अध्यक्षतेखाली, नगरसेवक दानेश साखरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, विज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगात आपल्याला टिकुन राहायचे असेल तर शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे कारण शिक्षण म्हणजे डोक्यातील अंधकार दूर करणारी ज्योत आहे.शिक्षणामुळे मानवाचा सर्वांगीण विकास घडतो.म्हणुन पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य अध्यापनासह योग्य मार्गदर्शन करावे.कारण आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहे.
पुढे बोलताना म्हणाले की, प्रत्येक पालकांनी आपल्या उराशी स्वप्न बाळगून आपला पाल्य शिक्षित, सुशिक्षित, सुसंस्कृत, सृजनशील व सुजाण नागरिक घडला पाहिजे.त्याने आपल्या परिवाराचे , गावाचे तालुक्याचे नावलौकिक केले पाहिजे यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहावे.कारण प्रयत्न हे मातीचे कण रगडता तेलही गळे या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीने मेहनत करावी आणि आपल्या पालकांच्या अपेक्षेवर खरे उतरावे आणि त्यासाठी शिक्षक पालक व विद्यार्थी यांच्यातील त्रृणानुबंध जपणं गरजेचे आहे.अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने डॉ.अजय लांजेवार, विधानसभा अध्यक्ष योगेश नाकाडे, डॉ.भारत लाडे, सरपंच नरेंद्र लोथे, बाजार समिती चे उपसभापती अनिल दहीवले,संजय ईश्वार,रतिराम राणे, शुभांगी तिडके,सचिन साखरे,अनिल लाडे,प्रमोद तिडके तथा शाळा समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य विद्यार्थी व पालक उपस्थित होते.