खा.प्रफुल पटेलांच्या पुढाकाराने जिल्हावासीयांची झाली स्वप्नपुर्ती

0
22

मेडिकल कॉलेज मिळणार प्रशस्त इमारत : नागपूर मुंबईला जाण्याची पायपीट थांबणार

गोंदिया : जिल्ह्यास परिसरातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, त्यांची नागपूर, मुंबई, हैद्राबाद येथे उपचार घेण्यासाठी जाण्याची पायपीट कमी व्हावी व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यातच ही सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी खा. प्रफुल पटेल यांनी पुढाकार घेत गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळवून घेतली. या महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन रविवारी (दि.११) रोजी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड, यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांनंतर जिल्हावासीयांची स्वप्नपुर्ती खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने होत आहे.
गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांनी सुरुवातीपासूनच केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून रविवारी (दि.११) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे इमारतीचे भूमिपूजन देशाचे उपराष्ट्रपती  जगदिप धनखड , कार्यक्रमाचे अतिथी राज्याचे राज्यपाल रमेश बैस , राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजितदादा पवार , खासदार प्रफुल पटेल , राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ , गोंदिया जिल्हा पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम सह गोंदिया व भंडारा जिल्यातील मान्यवर अतिथी उपस्थित राहणार.
यामुळे जिल्ह्याच्या विकासात भर घालणारी ही बाब आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी शासनाकडून सन २०१३-१४ मध्ये ११३ कोटी रुपये मंजुर झाले हाेते. त्यानंतर राज्यशासनाकडून ६८९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मार्गातील सर्वच अडचणी दूर झाल्या आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. यामुळे जिल्हावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानले आहे.