देवरीत मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन

0
3

देवरी,दि.४:- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी काल बुधवारी  स्थानिक छत्रपती शिवाजी संकूलातून मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

देवरी पंचायच समितीचे गटशिक्षणाधिकारी यांचे आदेशाप्रमाणे, मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती व्हावी या उद्देशाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीला सकाळी आठ वाजता प्रा. मनोज भुरे यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर सुरवात झाली. सदर रॅलीचे संपर्ण नगरात भ्रमण करीत गाणी, घोषवाक्य यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.