ग्रीष्मकालीन व्यक्तित्व विकास व संस्कार शिबिर स्तुत्य उपक्रम -सेवानिवृत्त मुख्याध्यापक एच.बी.पटले

0
2

गोरेगाव,दि.०२-स्व ब्रीजलालजी कटरे हायस्कूल शहारवाणी येथे 1मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. वार्षिक निकाल व ग्रीष्मकालीन व्यक्तिमत्व विकास व संस्कार शिबिर उद्घाटन सोहळा (Summer Camp) कार्यक्रम घेऊन आनंददायी वातावरनात संपन्न करण्यात आले. सर्वप्रथम ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आले. तदनंतर समर कॅम्पचा उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला तसेच शाळेचा 8 वी 9वी वर्गाचा वार्षिक निकाल घोषित करण्यात आला व प्राविण्य प्राप्त वर्ग आठवा कु.मानसी संतोष पटले कू.निधी कृष्णकुमार बिजेवार कू.सानिया दिलीप पटले व वर्ग 9 वा कू .प्रिन्सि कैलास बांगरे कू.युक्ती रामेश्वर टेकाम कू .कल्याणी राहांगडाले या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गुणपत्रिकेचे वाटप करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाला सेवानिवृत्त मुख्याध्यापक अक्षरांचे जादूगर बी.के. पटले,सेवानिवृत्त मुख्याध्यापक एच. बी.पटले, उपसरपंच तुकारामजी गौतम, योगा प्रशिक्षक पि.के साकूरे,नृत्य प्रशिक्षिका कुमारी रिया धमगाये , कराटे प्रशिक्षक दुबे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हितेंद्रजी ठाकरे, शाळेचे मुख्याध्यापक आर.वाय.कटरे, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत पार पडले.यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक एच. बी.पटले यांनी सांगितले की, सदर दहा दिवसीय ग्रीष्मकालीन शिबिर हे स्तुत्य उपक्रम आहे, याचा सर्वांनी पुरेपूर लाभ घ्यावे.ग्रामीण भागात शाळेत असे अयोजन करने विद्यार्थ्यांकरीता प्रेरणादायी ठरेल. तसेच शाळेचे मुख्याध्यापक आर.वाय.कटरे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की दहा दिवसीय शिबिरात नियमीत सकाळी 07:00 ते 11:00 या वेळेत
योगा, प्राणायाम ,नृत्य ,कला ,चित्रकला , सुंदर हस्ताक्षर ,स्पिकिंग इंग्लिश, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्रांचे आयोजन निःशुल्क करण्यात आले आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी या नियमित उपस्थित राहून शिबिराचे लाभ घ्यावे व आपले उत्तम व्यक्तीमत्व घडवावे असे आवाहन शाळेतर्फे करण्यात येत आहे.कार्यक्रमाचे संचालन सहायक शिक्षक के. के .यादव व आभार प्रदर्शन सहायक शिक्षीका कू. ओ. बी. ठाकरे यांनी केले.