पी.डी.राहांगडाले कनिष्ठ महाविद्यालय उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

0
15

गोरेगाव,दि.२१ः स्थानिक पी.डी.राहांगडाले कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथील वर्ग 12 वीचा एकुण निकाल 96.00 टक्के लागला असून विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के व कला शाखेचा निकाल 91.75 टक्के लागला असून कला विभागात प्रथम कु.अर्पिता जितेंद्र चौहान, द्वितीय ईशाबाई श्रीराम तुरकर, तृतीय दिपक राजेश शर्मा तर विज्ञान विभागाचा निकाल 100 टक्के लागला असून प्रथम तृप्ती ओमप्रकाश बघेले, द्वितीय चेतना होमराज राहांगडाले, तृतीय खोमेश प्रमोद राठोड व पृथ्वीराज भोजराज पटले यानी चौथा क्रमांक पटकावला आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव एड. टी.बी.कटरे,अध्यक्ष डॉ. टी.पी.येळे ,संचालक यु.टी.बिसेन ,प्राचार्य सी.डी.मोरघडे,पर्यवेक्षक ए.एच.कटरे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांनी केले आहे.