पी.डी.राहांगडाले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एसएससी परीक्षेत मिळविले यश

0
34

गोरेगाव,दि.२७ः- येथील पी.डी.राहांगडाले विद्यालय गोरेगाव येथील मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या वर्ग 10 वीचा शाळेचा एकुण निकाल 93.50 टक्के लागलेला आहे.शाळेतंर्गत प्रथम अभय संजय कटरे 92%, द्वितीय कु. प्राची व्यंकटराव रहांगडाले 91.20% , तृतीय अविराज भोजराज पटले 88.20% तसेच प्राविण्य श्रेणीत कु. राधिका रेखलाल रहांगडाले, कु. प्रिंसी जयेंद्र ठाकुर, कु. दिया राजू धमगाये, कु.प्रांजल महेन्द्र पटले,कु. मासूम दुर्वराज वैद्य, कु. दिप्ती शिवनारायण बिसेन,प्रेम ओमप्रकाश ओंकार,कु.लक्ष्मी हेमराज रहांगडाले व कु. दिया शालिकराम येळणे यांनी यश संपादन केले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव एड. टी.बी.कटरे,अध्यक्ष डॉ. टी.पी.येळे ,संचालक यु.टी.बिसेन ,प्राचार्य सी.डी.मोरघडे,पर्यवेक्षक ए.एच. कटरे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांनी केले आहे.