गोंदिया ता.30 मे :– कुंभारे नगर येथील रहिवासी अंशुल अरविंद साखरे यांनी इयत्ता 10 विच्या परीक्षेत 97 टक्के गुण प्राप्त करून गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात मुलांमधून प्रथम गुणवंत ठरला आहे.
परिणामी त्याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.अंशुल हा येथील विवेक मंदिर शाळेचा विद्यार्थी आहे. इयत्ता 10 वी चा निकाल नुकताच जाहिर झाला आहे. यामध्ये अंशुल ह्याला 500 गुणांपैकी 485 गुण मिळालेआहेत.
उल्लेखनीय असे की त्याला गणित विषयात 100 पैकी 100 गुण तर विज्ञान विषयात 99 गुण मिळाले आहेत.
अंशुलचे आई वडील हे शासकीय नोकरीत असून वडील ग्रामसेवक आणि आई शिक्षिका आहेत.
त्याने आपल्या यशाचे श्रेय आपल्या गुरुजनांना आणि आईवडिलांना दिले आहे.