गोरेगाव :– स्थानीय मॉडेल कॉन्व्हेंट एन्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव मध्ये गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे निकालाची परंपरा कायम राखत महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कडून घेण्यात आलेल्या परीक्षेत वर्ग 10 वी 12 वि च्या विध्यार्थ्यांनि भरघोश यश संपादन करत आपले नाव प्रवीण्यप्राप्त यादीत आपले कोरून शाळेला गौरवन्वित केले आहे. वर्ग 10 वितून 41 विध्यार्थी परीक्षेत बसले होते त्यामध्ये कु. वैदेही एन. ठाकूर हिने 92.60 टक्के घेऊन प्रथम, कु. सायली उत्तम कटरे हिने 92.20 टक्के घेऊन द्वितीय, कु. ख़ुशी कैलास पून्जे हिने 91.80 टक्के घेऊन तृतीय, साहिल उमेश लांजेवार याने 91.60 टक्के घेऊन चतुर्थ, कु चिन्मयी प्रीतम टेम्भेकर हिने 91.00 टक्के घेऊन पाचवा, मृणाल रामू मुंगमोडे याने 90.60 टक्के घेऊन सहावा क्रमांक प्राप्त केला. एकूण 41 विध्यार्थ्यापैकी 35 विध्यार्थी प्रविण्यासूचित उत्तीर्ण झाले आहेत. वर्ग 12 वितून डॉली मिताराम नागोशे हिने प्रथम, आरुषी रहांगडाले हिने द्वितीय तर अंशिका पान्डे हिने तृतीय क्रमांक पटकवीला आहे. या सर्व विध्यार्थ्याच्या यशाबद्दल शाळेतर्फे संस्था सचिव प्रा आर. डी. कटरे यांच्या हस्ते शाळेचे प्रशासकीय अधिकारी, प्राचार्या, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्तिथीत पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार करतेवेळी विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा उपस्थित होते. विध्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्था सचिव, प्रशासकीय अधिकारी, प्राचार्या, पर्यवेक्षक, शिक्षक वृंद व आपल्या आई वडिलांना दिले.