पंढरीबापू देशमुख विद्यालय येरंडी/महागांव येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0
13

अर्जुनी मोरगाव,दि.३०ः राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यात अर्जुनी मोरगांव तालुक्यातील पंढरीबापू देशमुख विद्यालय येरंडी/महागांव येथील वर्ग १० वी चा शाळेचा एकुण निकाल ९९.३० टक्के लागलेला आहे. शाळेतंर्गत प्रथम कु.साक्षी किशोर नाकाडे ८६.६०%, द्वितीय कु. नूतन कैलास सावरकर ८६.२०%, तृतीय कु. शितल प्रकाश गेडाम ८४.८०% तसेच प्राविण्य श्रेणीत वैष्णवी गुणाजी उपरीकर, प्रतिक्षा राजीराम डोंगरवार, रीया रमेश शहारे यांनी यश संपादन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे केंद्रप्रमुख बोरकर,मुख्याध्यापक जे. के. काळसर्पे, मल्लिक, मस्के, झलके, बन्सोड, लंजे, पारडे, रूखमोडे व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे उपस्थित राहून अभिनंदन केले आहे.