OBC विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण

0
648
वाढदिवसाच्या शुभेच्छा

पुणे, दि.२३ : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या स्वायत्त संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सन २०२४-२५ या वर्षातील स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने ३ जूलैपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे.

महाज्योतीमार्फत केंद्रीय नागरी सेवा परीक्षा, राज्यसेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा, स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षा, बँकिंग, एलआयसी व रेल्वे परीक्षा आदी परीक्षांसाठी नामांकित प्रशिक्षण संस्थेत मोफत पूर्व प्रशिक्षण राबविले जाते. प्रशिक्षणाबाबतचे सर्व तपशील, निकष, अटी व शर्ती तसेच अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया याबाबतची माहिती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाज्योतीमार्फत प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्यात विद्यावेतन तसेच प्रशिक्षणासाठी रुजू होताना एकरकमी आकस्मिक निधीदेखील देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड प्रवेश परीक्षेद्वारे होणार आहे.

राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील इच्छुक विद्यार्थ्यांनी विहित कालावधीत अर्ज करावा. तसेच अधिक माहितीसाठी ०७१२-२८७०१२०/१२१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन महाज्योतीचे प्रकल्प व्यवस्थापक विकास गडपायले यांनी केले आहे.