गोरेगांव–येथील पी डी राहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथे 78 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सत्र 2023-24 या सत्रातील ईयत्ता दहावी व बारावीत राज्य बोर्डाच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थांचे सत्कार करण्यात आले .विद्यार्थ्यांना ग्यानीरामभाऊ देशमुख चॅरिटेबल ट्रस्ट गोरेगाव तर्फे पुरस्कार, निर्मल कॉम्प्युटर गोरेगाव, आयसेक्ट कॉम्प्युटर गोरेगाव व अनंदाबाई फगलाल बघेले स्मॄतिपुरस्कार, स्व.देवाबाई पटले स्मॄतिपुरस्कार, तसेच स्व. दादुरामजी राहांगडाले स्मॄतिपुरस्कार देण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामहिता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ टी पी येडे ,उदघाटक.पी एफ बघेले माजी प्राचार्य, बक्षिस वितरक संचालक पटले साहेब होते . या कार्यक्रमाला सेवानिवृत केद्र प्रमुख बी डी पटले, डी डी रहांगडाले, प्राचार्य सी डी मोरघडे , शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी,माता पालक संघाचे पदाधिकारी,पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे संचालन ए एस बावनथडे व सी आर बिसेन यानी केले तर आभार एस आर मांढरे यांनी मानले.
गुणवंत विद्यार्थी- वर्ग 10वा- प्रथम अभय संजय कटरे,द्वितीय प्राची व्यंकटराव राहांगडाले,तृतीय अविराज भोजराज पटले,चतुर्थ राधिका रेखलाल राहांगडाले.
वर्ग 12 वी विज्ञान -प्रथम तृप्ती ओमप्रकाश बघेले, द्वितीय चेतना राहांगडाले,तृतीय खोमेश राठोड, चतुर्थ पृथ्वीराज पटले
वर्ग 12 वी कला- प्रथम अर्पिता जितेंद्र चौहान,द्वितीय ईशा श्रीराम तुरकर,तृतीय दिपक राजेश शर्मा, चतुर्थ नेहा प्रदिप सरोजकर.या सर्व प्राविण्य प्राप्त प्रज्ञावंत विद्यार्थीचे पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.