वर्धा – वर्ध्याच्या जवळ असलेल्या पवनार येथे धाम नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पाच ते सहा जणांनी धाम नदीच्या पात्रात पोहण्यासाठी पाण्यात उडी टाकली होती. दोघांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
बुडालेल्या तिघांपैकी एकाला ग्रामस्थांकडून वाचविण्यात यश आले तर इतर काहींनी कसंबसं मार्ग काढत नदी पात्राचा काठ गाठला. पण यात मात्र पोहता येत नसलेल्या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुभाई खान व नसिम खान यांचा मृतकामध्ये समावेश असून दोघेही मृतक उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. वर्धा येथे प्लास्टर ऑफ पॅरिस चे बांधकाम कामात हे युवक होते. बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह काढण्यात पोलिसांना यश आले आहे.