ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी 30 संप्टेबर पर्यत Obc विद्यार्थ्याकडून अर्ज आमंत्रित

0
13910

भंडारा,दि.19 : सन 2024-25 या सत्रापासून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यास दिनांक 13 डिसेबर,2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे.सदर योजनेसाठी दिनांक 11 मार्च,2024 च्या शासन निर्णयान्वये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

           तसेच इतर मागास वर्ग,विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष प्रवर्गातील 12 वी नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याकरिता मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रभूत प्रवेश प्रक्रियाद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतू शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या सन 2024-25 या सत्रापासुन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या योजनेसाठी अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे.

         तरी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी उच्च शिक्षणाचे द्वितीय,तृतीय,चतुर्थ वर्षामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिनांक 30 संप्टेबर,2024 पर्यत व प्रथम वर्षामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिनांक 15 ऑक्टोबर,2024 पर्यत परीपुर्ण भरुन अर्ज सहाय्यक संचालक,इतर मागास,बहुजन कल्याण कार्यालय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,सिव्हिल लाईन,जिल्हा परिषद चौक,भंडारा या कार्यालयात अर्ज सादर करावे.असे आवाहन इतर मागास,बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक,बाबासाहेब देशमुख यांनी कळविले आहे.