OBC योजनांची माहिती देण्यासाठी 20 ऑगस्टला तालुकास्तरीय मेळावे

0
481
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया,दि. 19: योजनांची माहीती  लाभार्थ्यापर्यंत  पाहोचविण्यासाठी गोंदिया तालुक्यामध्ये  दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी  तालुकास्तरीय माहिती मेळावे स्थळ डाँ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयच्या मागे, पतंगा मैदान, गोंदिया येथे आयोजित केलेले आहे. लाभार्थ्यांनी या मेळाव्यात उपस्थित राहून योजनांचा लाभ  घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

इतर मागास बहुजन कल्याण, विभागामार्फत इ.मा.व.वि.जा.भ.ज. व वि.मा.प्र. या समाजाकरिता अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या विभागामार्फत महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जाती विकास महामंडळ ही महामंडळे व त्याअंतर्गत उपकंपन्या तसेच महाज्योती, अमृत यासारख्या संस्थामार्फत देखील अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. सदरहु योजनांची माहीती लाभार्थ्यापर्यंत पाहोचविण्यासाठी गोंदिया तालुक्यामध्ये दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी तालुकास्तरीय माहिती मेळावे स्थळ डाँ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी  कार्यालयच्या मागे, पतंगा मैदान, गोंदिया येथे आयोजित केलेले आहे.