गोंदिया,दि.१९ः– तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टेमनी येथे १७ आँगस्टला झालेल्या शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठण पालक सभा सरपंच योगेश पटले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या सभेत गावातील सामाजिक कार्यकर्ते नरेश परिहार यांची शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी तर सौं वर्षा प्रवीण राऊत यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.सोबतच इतर सदस्यांचीही निवड करण्यात आली.या सभेला उपसरपंच शैलेंद्र डोंगरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अशोक दमाहे,पोलीस पाटील प्रियंका नादने,माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश आंबेडारे,शाळेचे मुख्याध्यापक श्री.उके,सहाय्यक शिक्षक नरेंद्र गौतम,श्री.कुंभरे,श्री रहागंडाले यांच्यासह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.