जल जंगल आणि जमीन टिकवून ठेवण्याचे सगळे श्रेय आदिवासी समाजाला : माजी मंत्री राजकुमार बडोले

0
118

सडक अर्जुनी,दि.१९ : क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांनी कमी वयातच देशविरोधी शक्तींपुढे न झुकता, इंग्रजांसोबत कसल्याही प्रकारची संधी न करता इंग्रजाना सळो की पळो करून सोडले होते. आज देशाच्या राष्ट्रपती पदावर एक आदिवासी महिला आहे याचा सार्थ अभिमान असून नागरिकांनी आदिवासी समाजासाठी सुरू असलेल्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे.

९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस समस्त जगाने साजरा केला. त्या निमित्त राष्ट्र घडविणाऱ्या आदिवासी समाजातील विविध प्रमुख व्यक्तींचा सत्कार समारंभ जागतिक आदिवासी दिवस सप्ताह कार्यक्रमाच्या निमित्ताने आशीर्वाद सभागृह लॉन सडक अर्जुनी येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी जल जंगल आणि जमीन टिकवून ठेवण्याचे सगळे श्रेय आदिवासी समाजाला जात असल्याचे मत व्यक्त केले.

आदिवासी समाज हा अनेक वर्षांपासून जंगलात राहत असून सर्व सोयी सुविधा शहरात असतांना सुद्धा त्यांनी पर्यावरण संवर्धन करण्यासाठी जंगलातच राहणे पसंत केले. त्यांच्या या त्यागामुळे आज निसर्ग टिकून आहे. आज आदिवासी समाजातील व्यक्ती देशाच्या राष्ट्रपती पदी विराजमान आहे हे फक्त भारतीय जनता पक्ष करू शकते. या आधी सुद्धा राष्ट्रपती पदी एका मुस्लिम वैज्ञानिकाला भाजप ने संधी दिली त्या नंतर एका दलित व्यक्तीला देशाच्या राष्ट्रपती पदी विराजमान केले आणि आज एक आदिवासी महिला देशाच्या राष्ट्रपती पदी विराजमान आहे हे या आदिवासी समाजासाठी गौरवाची बाब असली पाहिजे.

शासनाने अनेक योजना आदिवासी समाजासाठी राबविल्या आहेत. त्यांचा पुरेपूर लाभ आदिवासी समाजाने घेतला पाहिजे सोबतच प्रत्येक कार्यकर्त्याने आदिवासी समाजासाठी त्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या सोडविणीसाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचे आवाहन राज्याचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

सत्कार समारंभाचा उद्घाटन सोहळा भाजप आदिवासी आघाडी चे प्रदेश महासचिव तसेच गोंडवाना विद्यापीठाची सिनेट सदस्य डॉ. प्रकाशजी गेडाम यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री राजकुमारजी बडोले तर सहउद्घाटक म्हणून माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी होते. यावेळी भाजप आदिवासी आघाडीचे जिल्हाअध्यक्ष हनवंत वट्टी, भरत मडावी, लक्ष्मीकांत धनगाये, डॉ. लक्ष्मण भगत, संगीताताई खोब्रागडे, प्रीतीताई कतलाम, भुमेश्वर पटले, कविता रंगारी, निशाताई तोडासे, चन्द्रकलाताई डोंगरवार, विश्वनाथ रहांगडाले, अशोक लांजे, चेतन वळगाये, सपनाताई नाईक, रमेश पंधरे, शशीकलाताई ताराम, दीपालीताई मेश्राम, गिरीधरजी हत्तीमारे, ओंकारजी टेंभुर्णे, रंजनाताई भोई, प्रतिभाताई भेंडारकर, तुकारामजी राणे, प्रल्हादजी वरठे, खेमराजजी भेंडारकर, तुलारामजी येरणे, शिशिरजी येळे, हितेशजी डोंगरे, सुभाषजी कुळमेथे, ललितजी डोंगरवार, देविदासजी कोवे तसेच मोठ्यासंख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.