गोंदिया,दि.२२-भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांची जयंती दरवर्षी ‘सद्भावना दिवस’ म्हणून साजरी
केली जाते.सर्व धर्म, भाषा आणि प्रांतातील लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि सांप्रदायिक सौहार्द वाढवणे हा सद्भावना दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे.
या अनुषंगाने गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाध्ये प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांच्या मार्गदर्शनात ‘सद्भावना दिवशी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत ‘सद्भावना प्रतिज्ञा’ घेतली. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. जयंत महाखोडे, डॉ. डी. जी. नालमवार, डॉ. सुशिल पालीवाल, डॉ. किशोर हातझाड़े, डॉ. शीतल बैनर्जी, डॉ. सोनल वर्मा प्रामुख्याने उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे समन्वयन डॉ. स्नेहा जयस्वाल यांनी केले.