सडक अर्जुनी व सालेकसासह ७० प्रशिक्षणार्थी नगरपंचायत मुख्याधिकार्यांच्या नियुक्त्या

0
1927
 गोंदिया,दि.२२ राज्यातील जवळपास ७० नगर पालिका,परिषद तथा नगर पंचायतीमध्ये मुख्याधिकारी पदावर प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी पदी नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.कालच राज्याच्या नगर विकास मंत्रालयाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी छापवाले यांच्या स्वाक्षरीने हे आदेश जारी करून संबंधितांना त्वरित रुजू होण्याचे सांगण्यात आले आहे.यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी म्हणून सारंग खांडेकर व  सालेकसा नगरपंचायत मुख्याधिकारी पदी प्रमोद कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
   सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्यसेवा (मुख्य) परिक्षा-२०२१ च्या अंतिम निकाला व्दारे एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-९ अंतर्गत मुख्याधिकारी गट-अ आणि गट-ब या संवर्गासाठी निवड झालेल्या उमेदवारांना विभागाच्या आदेशान्वये खातेनिहाय जिल्हा संलग्नता देण्यात आली आहे. सदर खातेनिहाय जिल्हा संलग्नता पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
 
   एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-९ अंतर्गत खातेनिहाय जिल्हा संलग्नता प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत संलग्नता प्रशिक्षण चालु असलेल्या मुख्याधिकारी, गट-अ संवर्गातील १५ व गट-ब संवर्गातील ७१ परिविक्षाधीन मुख्याधिकाऱ्यांची On field Training स्वरुपात पदस्थापना त्यांच्या नावासमोर स्तंभ क्र.३ येथे दर्शविलेल्या नगरपरिषदा, नगर पंचायती व महानगरपालिकेत करण्यात येत आहे.