अर्जुनी मोर.-भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा टप्पा -२ हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता राबविण्यात येत आहे. सदर अभियाना जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरगाव यांनी सुरुवातीपासून सक्रिय सहभाग घेऊन शाळेत शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विविध भौतिक साधनांची उपलब्धता करून, तालुक्यात अव्वल क्रमांक प्राप्त केले .
सदर उपक्रमाची जिल्हा पातळीवर मूल्यांकन करण्यासाठी शिक्षणाधिकारी( प्राथमिक )सुधीर महामुनी, उपशिक्षणाधिकारी अशोक लांडे, शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मण चव्हाण व विश्वकर्मा मॅडम यांनी प्रत्यक्ष मूल्यांकन करून विद्यार्थ्यांचे गुणवत्ता विषयक व भौतिक सुविधांची उपलब्धतेबाबतची माहिती जाणून घेतली. शालेय परिसर, शाळेतील उपलब्ध भौतिक सुविधा ,विद्यार्थ्यांची गुणवत्ता यावर समाधान व्यक्त केले असून, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग घडवून विद्यार्थ्यांना पूरक असे मार्गदर्शन करण्यात यावे व अधिकाधिक विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांनी दिले. याप्रसंगी मूल्यांकन समिती समितीचे स्वागत मुख्याध्यापक रेखा गोंडाणे केंद्रप्रमुख सु.मो. भैसारे, विषय शिक्षक पी. टी. गहाणे, व्ही. बी. भैसारे ,जे. एन. ठवकर, आर. पी. उईके, अचला कापगते, रूपाली मेश्राम, ऋषीश्वर मेश्राम विशेष शिक्षक गजभिये यांनी बॅचेस लावून स्वागत केले. प्रस्तुत प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी लोदी ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रमेश लाडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सोनूताई कराडे, सदस्य मुनेश्वर शहारे ,अंगणवाडी सेविका शीला वासनिक आदी उपस्थित होते.