गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन १७ रोजी

0
6

गोंदिया : युवा कोसरे कलार समाज संस्थेच्यावतीने १७ जुलै रोजी द्वारका लॉन येथे कलार समाजातील १0 वी १२वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
विशेष म्हणजे स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष तिर्थराज उके, कोषाध्यक्षदिनेश फरकुंडे, सहकोषाध्यक्ष जगदीश उके, सचिव दिलीप फरकुंडे, सहसचिव उमेश सहारे, उपाध्यक्ष सतीष मेश्राम, मुलचंद फरकुंडे, संतोष मेश्राम व पदाधिकार्‍यांकडे १0 जुलै पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आलेले आहे.