गोंदिया, दि.11 : जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता नववी व अकरावी (सत्र 2025-26) च्या रिक्त जागांसाठी निवड चाचणीद्वारे प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. इच्छुक पात्र उमेदवार पुढील वेबसाईट लिंक ला भेट देऊन विनामूल्य अर्ज करु शकतात.
इयता नववी साठी LEST-2025 करीता https://cbseitms.nic.in/2024/nvsix/ आणि इयत्ता अकरावी साठी LEST-2025 करीता https://cbseitms.nic.in/2024/nvsxi_11 आहे. उमेदवारांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जात सुधारणा/बदल करण्यासाठी ऑनलाईन विंडो केवळ लिंग (पुरुष/स्त्री), श्रेणी (सामान्य/ओबीसी/अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती), क्षेत्र (ग्रामीण/शहरी), अपंगत्व आणि परीक्षेचे माध्यम यामध्ये दुरुस्ती/सुधारणा करण्याकरीता ऑनलाईन विंडो ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर पुढे दोन दिवस सुरु राहील. असे जवाहर नवोदय विद्यालय नवेगावबांधचे प्राचार्य एम.एस.बलवीर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.