खर्च निरीक्षक नागेंद्र भुकया यांनी घेतला गोंदिया विधानसभा क्षेत्राचा खर्च विषयक आढावा

0
84

गोंदिया, दि.11 : गोंदिया विधानसभा क्षेत्राचा खर्च विषयक बाबीचा आढावा घेण्याकरिता खर्च निरीक्षक नागेंद्र भुकया यांनी निवडणूक निर्णय अधिकारी गोंदिया कार्यालयाला भेट दिली. यावेळी जिल्हा नोडल अधिकारी खर्च जनार्दन खोटरे, सहाय्यक जिल्हा खर्च नोडल अधिकारी संदिप बोरकर, खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत इंगोले व गोंदिया विधानसभा क्षेत्रातील विविध पक्ष उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

        खर्च निरीक्षक नागेंद्र भुकया यांनी उमेदवारांचे खर्च नोंदवताना तसेच पर्यवेक्षण अधिक चांगल्या पद्धतीने करण्याच्या दुष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या. SOR रजिस्टरमध्ये खर्च नोंदवताना पुरावे म्हणून फोल्डर ऑफ इव्हिडन्स व्यवस्थित ठेवणे, ते सहाय्यक खर्च निरीक्षक यांनी प्रामाणित करणे, दर सूचीनुसार व्यवस्थित दर नमूद करणे, पेड न्यूज तपासताना कोणकोणत्या बाबी तपासणे आवश्यक आहे, तसेच त्यांनी खर्च विषयक टीमला काम करतांना उमेदवारांच्या खर्चाच्या बाबतीत दक्ष राहून वेळीच नोंदी घेऊन खर्चाचा अहवाल दररोज पाठविण्याच्या सूचना दिल्या.