आश्रमशाळेतील विद्यार्थांचे जलद ताप सर्वेक्षण सुरु

0
174

मुलांनो , कुठलाही ताप कमी न समजता रक्ताची तपासणी अवश्य करा-डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी
 
गोंदिया -जिल्ह्याची सीमा ही मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्याला व गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे. आता दिवाळी सणा नंतर जिल्ह्यातील शाळा,महाविद्यालय व आश्रमशाळा पुर्वरत सुरू झालेले आहे.बरेचसे आश्रमशाळेतील विद्यार्थी दिवाळी सुटी आटोपुन पुन्हा आश्रम शाळेत वास्तव्यास आलेले आहे.विशेष करुन आश्रम शाळेतील मुले हे गडचिरोली,छत्तीसगड भागातील सीमा ला लागून असणाऱ्या गावातून सुटी आटोपुन पुन्हा शिकण्यासाठी गोंदियात आलेले आहे.गोंदिया जिल्ह्याला लागून असलेले गावे हे हिवताप दृष्ट्या अतिशय जोखमीचे असल्याने हिवताप संसर्ग घेऊन ते गोंदियात येतात व आजारी पडतात.तरी आश्रमशाळेतील मुख्याध्यापक ,शिक्षक यांनी त्वरित आजारी मुलांना गावातील आशा स्वयंसेविका जवळ असलेले हिवताप संबंधाने आर.डी के किट ने तपासणी करून जवळच्या आरोग्य संस्थेत घेऊन जाण्याचे आवाहन डॉ.विनोद चव्हाण ,जिल्हा हिवताप अधिकारी गोंदिया यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय,निमशासकिय, अनुदानित,खाजगी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची हिवतापासंबधी जलद ताप सर्वेक्षण अंतर्गत रक्त तपासणी मोहिम सुरु करण्यात आली आहे.जिल्हा हिवताप प्रशासनाने सर्व प्राथमिक आरोग्य केंन्द्राना कार्यक्षेत्रातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची हिवताप संबंधाने आर.डी के किट ने तपासणी करण्याचे आदेश दिले आहे.त्या अनुशंगाने सामुदायिक आरोग्य अधिकारि,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आशा सेविका यांचे पथक बनविण्यात आले असुन ते पथक आश्रमशाळेंना भेटि देवुन विद्यार्थ्यांची हिवतापासंबधी रक्त तपासणी करित आहे.आरोग्य सहाय्यक यांच्यामार्फत योग्य पर्यवेक्षण होत आहे.जिल्ह्यात हिवतापा संबधी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु असल्याचे डॉ.विनोद चव्हाण,जिल्हा हिवताप अधिकारी यांनी माहिती दिली आहे.
आश्रमशाळेने आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा.पाणी साठ्यावर झाकण ठेवावे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, मच्छरदाणीचा वापर करावा, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी, भंगार सामान व निकामी टायर यांची विल्हेवाट लावावी,कुलर,फ्रिजच्या ड्रीपपॅन मधील पाणी नियमितपणे स्वच्छ करावे.पाण्याचा हौद,टाक्या,रांजण इत्यादी दर आठवड्याला स्वच्छ करावे.नाल्या,गटारे वाहती करणे,साचलेल्या पाण्यात डबक्यात जळलेले ऑइल/ रॉकेल सोडणे, कुंडी व फुलदाणी मधील पाणी बदलवित जाणे, परिसरातील आजुबाजुला असलेले टायर्स, बाटल्या, बादल्या,करवंटे या मधील पाणी फेकणे,डासाला पळवुन लावणार्या साधनांचा वापर करणे,झोपताना पुर्ण अंग झाकले जाईल असे कपडे वापरावे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे अशा विविध उपाययोजना अंमलात आणुन किटकजन्य प्रतिबंधात्म पावले उचलुन जिल्हा आरोग्य प्रशासनाला सहकार्य  करण्याचे आवाहन डॉ.विनोद चव्हाण यांनी केलेले आहे.
आश्रमशाळेतील किंवा ईतर शाळेतील मुलांनी हिवताप सदृश्य कुठलीही लक्षणे जसे ताप, सर्दी ,अंगदुखी, मळमळ, उलटी, जुलाब, ह्गवण व अतिसार इत्यादी लक्षणे दिसल्यास कुठल्याही भोंदुबाबा किंवा अप्रशिक्षित,पदवी नसलेल्या डॉक्टरांना न दाखवता जवळच्या शासकीय दवाखान्यात जाऊन तपासणी करुन घेणे व कुठलाही ताप हलका न समजण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी केले आहे.