जिल्ह्यावर दु:खाचे डोंगर, मात्र आमदार पुरामांना विजयोत्सवाचा मोह आवरेना

0
2198
  • गोंदिया,दि.२९:: जिल्ह्यात शिवशाही बसच्या भीषण अपघाताचे वृत्त पसरताच सर्वत्र शोककळा पसरली होती.या घटनेतील ११ मृत प्रवाशांचा व २९ जखमींच्या बसच्या अपघाताच्या वेळच्या किंकाळ्या या ये-जा करणार्यासह घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींच्या मनाला चटका लावणारी ही घटना मन हेलावणारी होती.जिल्ह्यात एवढी मोठी घटना घडलेली असतांना देशाच्या राष्ट्रपती,प्रधानमंत्री राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्र्यापासून सर्वच नेते शोकसंवेदना व्यक्त केल्या़ मात्र जिल्ह्यातील आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे नवनिर्वाचित आमदार संजय पुराम मात्र यास अपवाद राहिले.या भीषण घटनेनंतरही त्यांना आपला सत्कार व विजयी मिरवणूकीचा मोह टाळता आला नाही.जिल्ह्यात एकीकडे या दुःखद घटनेमुळे सर्वजण हळहळ व्यक्त करीत असतानाच दुसरीकडे नवनिर्वाचित आमदार संजय पुराम व त्यांच्या पत्नी महिला बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी सालेकसा शहरात विजयी मिरवणूक काढली. त्यांच्या या विजयी मिरवणूकीत महायुतीमधील घटक पक्षाचे नेतेही सहभागी झाले.जिल्ह्यातील प्रशासनासह लोकप्रतिनिधी दु:खात असतानाच पुराम कुटुंबियासह आमगाव मतदारसंघातील भाजप नेत्याच्या या भूमिकेवर जिल्ह्यातील नागरिकांत सर्वत्र नाराजी ्व्यक्त केली जात आहे.